Chimani Pakare [1952] | Full Movie | Babi Shakuntala | Raja Nene |Sulochana | Indira Chitnis| Raja G
https://www.youtube.com/watch?v=MN0FHhfCDA4
आल्हाद-चित्र ‘ चिमणीं पांखरं ‘ ची कथा सर्वस्वी निराळी आहे. पुण्याच्या एका दरिद्री चाळींतल्या एका दरिद्री कुटुंबांत घडलेली ती एक शंभर टक्के सत्यकथा आहे.
गोविंदा सावले एक टॅक्सी ड्रायव्हर होता. गरिबीच्या संसाराला ठिगळं लावण्याकरितां त्याची बायको शारदा, म्युनसिपालिटीच्या शाळेंत मास्तरकी करीत होती. पोटीं चार मुलं होतीं-सर्वात मोठी प्रभा आणि तीन धाकटे भाऊ.
गोविंदा थोडा तापट डोक्याचा होता. असेच एकदा बायको बद्दल गलिच्छ भाषा ऐकताच संताप अनावर होऊन तेच्या हातून खून होतो. त्याला डोंगरकपारीचा, रानावनाचा आश्रय केल्याखेरीज पर्याय उरत नाही.
खुनाची वार्ता सर्वत्र पसरली. गोविंदावर पकडवॉरंट सुटलं होतं. जिवंत असून तो जगाला आणि त्याच्या बायकोमुलांनाही मृत होता. त्यांतच शारदेचं बाळंतपण आलं आणि पैशाअभावी औषधपाणी न मिळाल्यामुळं शारदेचा प्राण गेला.
आतां तीन भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी बारा वर्षाच्या प्रभावर पडली. तीच आता त्या चिमण्या पाखरांची आई आणि बाप झाली.
चाळीत हजार तऱ्हेचीं हजार माणसं ! काही चांगले काही वाईट. त्याच चाळींत गंगुबाई नांवाची एक महामाया रहात होती. पोरं पोरकी ही तिला एक पर्वणीच वाटली. प्रभाशी गोड बोलून, सलगी करून एक दिवस तिनं मोठ्या युक्तीनं मुलांची राहण्याची जागा बळकावली आणि त्यांना अक्षरश: रस्त्यावर उभं केलं.
तिच्याशी झुंज घेण्याची ताकद प्रभात राहिली नव्हती. तिनं जखमी अंतःकारणानं माघार घेतली खालच्या मानेनं, पोरांना उराशी धरून तिनं चाळी बाहेर पाऊल टाकलं. पुन्हा ठोकर खाण्यासाठी, पुन्हा घाव झेलण्यासाठी, पुन्हा जखमी होण्यासाठी आणि पुन्हा माघार घेण्यासाठी.
Enjoy the full Marathi movie “Chimani Pakare”.
Share, Like, Comment and Subscribe to our channel for more.
Label- Saregama India Limited.
For more videos log on & subscribe to our channel :
http://www.youtube.com/saregamamarathi
To buy the original and virus free track, visit http://www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
http://www.facebook.com/Saregama
Follow us on Twitter: https://twitter.com/saregamaglobal
For Mobile download Visit : mobile.saregama.com